Take a fresh look at your lifestyle.

हिना खानच्या कुटुंबाला कोरोनाचा विळखा; मास्कमुळे चेहऱ्याची झाली दशादशा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सध्या संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोनाशी दोन हात करीत आहे. सामान्य माणूस ते राजकीय नेते मंडळी आणि अगदी सेलिब्रिटी कलाकार देखील कोरोनाच्या संसर्गापासून वाचू शकत नाहीत हे दिसून येत आहे. पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर दिसतोय. या तिसऱ्या लाटेत अनेक बॉलिवूड कलाकार देखील कोरोनाने त्रस्त झाले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे कुटुंब देखील यात अडकले आहे. बॉलिवुड आणि मालिका इंडस्ट्रीतील अभिनेत्री हिना खान हीचे कुटुंब सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. मात्र हिनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्यामुळे तिच्या चाहत्यांची थोडी का होईना चिंता दूर झाली आहे. पण मास्कमुळे हीनाचा चेहरा इतका खराब झालाय की बस.. घरातल्यांची काळजी व्यक्त करणारी एक पोस्ट हिनाने शेअर केली आहे.

 

सध्या हिना आपल्या कुटुंबाची ती काळजी घेत आहे. आपले संपूर्ण कुटुंब कोरोनग्रस्त असल्यामुळे तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दुः ख व्यक्त केलं आहे. या फोटोंमध्ये तिच्या तोंडाला मास्क दिसत नाही. पण मास्कचे व्रण दिसत आहेत. मात्र तिच्या चेहऱ्यावर मास्क घालून लाल डाग उठले आहेत. हीनाने लिहिले की, आजचे एक कठोर सत्य हे आहे की, आयुष्य आणि इन्स्टावरचे फोटो सर्व चांगले व्हिज्युअल आहेत. हे २०२२ आहे त्यामुळे हे वर्ष २०२० पेक्षा जास्त कठिण वाटते. जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होतो आणि तुमचा कोरोना रिपोर्ट टिव्ह येतो. तेव्हा तुम्हाला मास्क आणि सॅनिटायझरसह २४ तास ७ दिवस तयार असावं लागते. कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. यामुळे काही खुणा, डाग, वर्ण दिसतात… जसं सध्या माझ्या चेहऱ्यावर मास्क घातल्याने दिसत आहे.

 

 

पुढे , जेव्हा आयुष्यात असे अडथळे येतात तेव्हा योद्धा व्हायला हवं किंवा प्रयत्न तरी करायला पाहिजेत. ही पोस्ट त्यासाठीच आहे. प्रयत्न करणेच खूप आहे. आता आपण सर्वांनी पुन्हा लढण्याचा प्रयत्न करूया. या डागासारखाच हा काळ देखील निघून जाईल. हिनाचा हा फोटो पाहून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. मागील वर्षात हिनादेखील कोरोना बाधित झाली होती. मात्र तिने कोरोनावर यशस्वी मात केली होती.