Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टेलीव्हिजन इंडस्ट्रीत हिना खान ही सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारी हिना हि तिच्या वडिलांच्या अगदी जवळ होती. सध्या ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे बर्‍याचदा सोशल मीडियावर वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसली. मात्र अचानक हिनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिना खानच्या वडिलांचे आज निधन झाले आहे. विश्वासू सूत्रांच्या माहितीनुसार, हिनाच्या वडिलांचे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले आहे.

सूत्रानुसार, हिना तिच्या व्यावसायिक कारणांमुळे परगावी आहे. तथापि, तिला या दुर्दैवी घटनेची माहिती देण्यात आली आहे आणि तिच्या वडिलांच्या अंतिम संस्कारांसाठी ती मुंबईत परतणार असल्याचे समोर येत आहे. हिनाच्या वडिलांविषयीची बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. तिच्या चाहत्यांनी शोक व्यक्त करीत समीक्षा पाठविल्या आहेत. हिनाच्या कुटुंबीयांनी अद्याप याबाबत अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही. मात्र हा क्षण हिना आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी किती शोकाकुल आहे हे सांगायला नको.

दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालेच तर हिना अलीकडेच तिच्या ‘बेदर्द’ या नवीन गाण्यात दिसली आहे. या गाण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे यात ती स्टेबिन बेनबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसत होती. या गाण्यात तिने ब्राइडल लूक परिधान केला असून ती फार सुंदर दिसत आहे. आतापर्यंत हिनाने दर्जेदार मालिकांमध्ये काम केले आहे. खतरों के खिलाडी आणि बिग बॉस या दोन्ही रिऍलिटी शो मध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र कितीही कामात आणि चर्चेत असणारी हिना नेहमीच आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढत असायची. वडिलांच्या अगदीच जवळ असणारी हिना वडिलांच्या दुरावण्याचे दुःख पचवू शकेल आणि लवकरच यातून सावरेल अशी प्रार्थना तिचे चाहते करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.