Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री हुमा कुरेशीचा ‘महारानी’ सिरीजमधील लूक ठरला चर्चेचा विषय

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी लवकरच आपल्या नव्या कोऱ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज झाली आहे. सोनी लिव्हवर येत्या २८ मे २०२१ रोजी बहुप्रतिक्षित सिरीज ‘महारानी’ प्रदर्शित होणार आहे. पण हि सिरीज येण्याआधी या हुमा कुरेशीने धारण केलेल्या लक्षवेधक व आकर्षक लुकची झलक ट्रेलरमधून दिसली आहे. डोळ्यांमध्‍ये काजळ आणि कपाळावर लाल बिंदी असलेल्‍या लुकमध्‍ये हुमा अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा हा लुक तिच्‍या भूमिकेला अगदीच साजेसा आहे. इंटरनेटवर धुमाकूळ निर्माण केलेल्‍या ट्रेलरमध्‍ये हुमाचा मुख्‍यमंत्री लुक एकदम भारी दिसत आहे. अगदी काळीच वेळात तिचा हा लूक प्रचंड चर्चेत असून चांगलाच वायरल झाला आहे आणि चाहते तिची प्रशंसा करीत दमतही नाहीयेत.

या सिरीजमधल्या सीएमच्‍या लुकसाठी हुमाने गडद रंगाच्‍या साडीसोबत शाल घेतली आहे. हा लुक तिच्‍या भूमिकेसाठी आवश्‍यक असलेल्‍या व्‍यक्तिमत्त्वाला प्रेक्षकांसमोर उत्तमरीत्या सादर करताना दिसत आहे. याबाबत माध्यमांसोबत बोलताना हुमा कुरेशी म्‍हणाली, “मी हि सिरीज सुरू होण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. ट्रेलरला खूपच उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि मला खात्री आहे की या शोच्‍या माध्यमातून प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन होईल. रानी भारतीची भूमिका बहुआयामी आहे. या भूमिकेमध्‍ये विविध छटा सामावलेल्‍या आहेत. म्‍हणूनच ही भूमिका साकारताना खूपच सन्‍माननीय वाटत आहे. भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी आम्‍ही विविध लुक्‍सचा प्रयत्‍न केला, ज्‍यामुळे त्यांच्या जीवनातील टप्‍प्‍यांना सादर करण्‍यामध्‍ये मदत झाली.”

निरक्षर असूनही प्रत्‍येक गोष्‍टीबाबतचे बारकाईने निरीक्षण करण्‍यापर्यंत बुद्धीकौशल्‍य प्राप्त असणारी, तसेच प्रामाणिक असण्‍यासोबतच कुटुंबावर घोंघावणा-या धोक्‍याबाबत लढाऊ वृत्ती ठेवणारी रानी भारती एक लक्षवेधक विरोधाभास असणारे महिला व्यक्तिमत्व आहे. पतीने घेतलेल्‍या निर्णयानंतर त्यांच्या जीवनात काय अडथळे निर्माण होतात. गायींचे दूध काढणे, शेण थापणे ते विविध विषमतांवर मात करीत कुटुंबाचे संरक्षण करणे अशा अनेक गोष्‍टी त्यांना कराव्‍या लागतात. या अश्या स्थितीवर राणी मात करणार का? अश्या आशयाचे हे एक सुंदर, रंजक आणि मनरमणीय असे कथानक आहे.

या सीरिजचे दिग्दर्शन करन शर्मा यांचे आहे. सुभाष कपूर यांनी निर्मिती केली आहे. या सिरीजमध्ये हुमासोबत सोहम शाह, अमित सियाल व विनीत कुमार हे कलाकार देखील अत्यंत मुख्य अश्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. नरेन कुमार व डिम्‍पल खारबंदा यांची सहनिर्मित ‘महारानी’ ही एक मनोरंजक मात्र काल्‍पनिक सिरीज आहे. महारानी येत्या २८ मे २०२१ रोजी केवळ सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सिरीजचा आनंद सोनी लिव्हवरच घेता येणार आहे.