Take a fresh look at your lifestyle.

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अगरवाल लवकरच चढणार बोहल्यावर ; केली लग्नाची घोषणा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अगरवाल लवकरच लग्न करणार असून तिच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. व्यावसायिक गौतम किचलूशी ती लग्नगाठ बांधणार असून त्याविषयीची घोषणा केली सोशल मीडियावर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काजलच्या लग्नाच्या जोरदार चर्चा होत्या. सोशल मीडियावर पोस्ट लिहित काजलने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

‘ मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी ३० ऑक्टोबर २०२० रोजी गौतम किचलूशी लग्नगाठ बांधत आहे. मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आयुष्याचा हा नवीन प्रवास एकत्र सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुमचं प्रेम आणि तुमच्या आशीर्वादासाठी खूप धन्यवाद’, असं काजलने लिहिलं.

View this post on Instagram

♾🙏🏻

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

लग्नानंतर काजल चित्रपटात काम करणार का या प्रश्नाचंही उत्तर तिने या पोस्टमध्ये दिलं. लग्नानंतरही मनोरंजनसृष्टीत काम करत राहणार असल्याचं तिने पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केल

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’