Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूडचे लांडगे आज एकत्र आलेत ; कंगनाची जहरी टीका

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात बॉलीवूड एकटवल असून शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. यावर आता अभिनेत्री कंगना राणावतने नाराजी व्यक्त करताना बॉलीवूड विरोधातच ताशेरे ओढले आहेत. बॉलिवूडमधील लांडगे वृत्तमाध्यमांविरोधात एकत्र आले, अशी टीका तिने केली आहे.

“बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र येऊन वृत्तमाध्यमांवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. ज्यावेळी मजुरांवर, शेतकऱ्यांवर, स्त्रियांवर, गरीब जनतेवर अन्याय होतो त्यावेळी ही मंडळी कुठे असतात? हे लोक आज मानवाधिकाराच्या गप्पा मारतायेत पण इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा गप्प बसतात.” अस ट्विट करुन कंगनाने सलमान शाहरुख वर निशाणा साधला आहे. यापूर्वी अशाच प्रकारची टीका दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याने देखील केली होती.

दरम्यान यापूर्वीही सुशांत आत्महत्या प्रकरणी कंगणाने बॉलीवूड मधील ड्रग माफिया आणि घराणेशाहीवर निशाणा साधताना अनेक कलाकारांवर टीका केली होती. त्यामुळे कंगना विरुद्ध बॉलीवूड असा सामना पाहताना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.