Take a fresh look at your lifestyle.

नव्या चित्रपटाची घोषणा करताना कंगनाने जया बच्चन यांना लगावला टोला

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडची क्विन अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून तिच्या सततच्यावादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सुशांत सिंग रजपूत आत्महत्या प्रकरणापासून कंगणा सतत बॉलिवूडमधील घराणेशाही ते ड्रग माफिया इथपासून ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर रोखठोक मतं मांडते.यावेळी ती आपल्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. कंगना लवकरच ‘धाकड’ आणि ‘तेजस’ हे दोन नवे अॅक्शनपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने या चित्रपटांची घोषणा केली.परंतु या चित्रपटांची घोषणा करताना तिने जया बच्चन यांना टोला लगावला आहे.

तेसज आणि धाकड या दोन आगामी चित्रपटांसाठी मी ट्रेनिंग सुरु केलं आहे. या चित्रपटांत मी सैनिक आणि एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या थाळीने मला खूप काही दिलं असेल पण मणिकर्णिकाचं यश माझं स्वत:च आहे. या चित्रपटातून मी बॉलिवूडला नवी अॅक्शन हिरोईन दिली.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगना अप्रत्यक्षरित्या जया बच्चन यांच्यावर टीका केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या महिन्यात राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या, “बॉलीवूड मध्ये ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. ज्या थाळीत खातात त्याच थाळीत भोकं पाडतात. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.