कंगणाचा निशाणा आता अरविंद केजरीवालांवर ; म्हणाली की आशा आहे, तुम्ही स्टेटमॅन बनाल
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. सुशांत सिंग रजपूत आत्महत्या, शेतकरी आंदोलनावर कंगणाने आपली रोखठोक मत मांडले. काही दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटले होते. त्यानंतर कंगनाने आता आपला मोर्चा दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांच्याकडे वळवला आहे.
दिल्लीतील रिंकू शर्मा हत्येप्रकरणी तिने केजरीवाल यांना डिवचणारे ट्विट केले आहे. अरविंद केजरीवाल यांचे २०१५ मधील एक ट्विट शेअर करत कंगनाने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपल्या या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी दादरीच्या मॉब लिचिंगमध्ये मारल्या गेलेल्या इखलाखच्या घरी भेट देणार असल्याची माहिती दिली होती.
Dear @ArvindKejriwal ji I really hope you meet Rinku Sharma’s family and support them also, you are a politician hope you become a statesman also. https://t.co/SpPyKWYUnZ
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 13, 2021
केजरीवाल यांच्या या ट्विटचा संदर्भ देत कंगनाने लिहिले, ‘केजरीवालजी, मला आशा आहे की,तुम्ही देखील रिंकू शर्माच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना पाठिंबा द्या. तुम्ही एक राजकारणी आहात. आशा आहे आता ‘स्टेटमॅन’ बनाल,’ असे ट्विट कंगनाने केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’