Take a fresh look at your lifestyle.

सरदार पटेलांना श्रद्धांजली अर्पण करताना कंगणाने साधला नेहरू-गांधींवर निशाणा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | जिथे जिथे कंगना, तिथे तिथे वाद हे समीकरण अजूनही सुरूच आहे. गेल्या काही दिवसापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना चर्चेत आहे. पुन्हा एकदा कंगनाने आपल्या वादग्रस्त विधानाने लोकांना चकित केले. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना कंगणाने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

कंगनाने ट्वीट केले की, ‘भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन. आपण अशी व्यक्ती आहात ज्याने आम्हाला आजचा भारत दिलाआहे, परंतु आपण पंतप्रधान पदाचा त्याग करून आमचे महान नेतृत्व आणि दूरदृष्टीची संधी सोडली. आपल्या निर्णयाबद्दल आम्हाला दुःख वाटते.

कंगना म्हणाली, ‘गांधींजीना खुश करण्यासाठी त्यांनी पहिल्या पंतप्रधान पदाचे बलिदान दिले कारण गांधींना वाटले की नेहरू उत्तम इंग्रजी बोलतात. केवळ सरदार पटेलच नव्हे तर संपूर्ण देशाला अनेक दशकांपासून त्रास सहन करावा लागला. खरं तर ज्यावर आपला हक्क आहे ते आपण निर्लज्जपणे काढून घेतले पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.