Take a fresh look at your lifestyle.

हा तर लोकशाहीचा विजय ; कोर्टाच्या निकालानंतर कंगणाने साधला सरकारवर निशाणा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री कंगना रनौतच्या (kangana ranaut) कार्यालयावर तोडकाम केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेचा (mumbai municipal corporation) निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे. कंगनाने न्यायालयाचे आभार मानत हा लोकशाहीचा विजय आहे, असं म्हणत स्वागत केले आहे.तसेच कंगणाने ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्याविरोधात उभी राहते आणि जिंकते, तेव्हा तो त्या व्यक्तीचा विजय नसतो, तर लोकशाहीचा विजय असतो, असं म्हणत अभिनेत्री कंगना रनौत हिने ठाकरे सरकारवर पलटवार केला. ज्यांनी मला धैर्य दिले, त्या प्रत्येकाचे आभार आणि ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नांची चेष्टा केली त्यांचेही आभार. तुम्ही खलनायकाची भूमिका निभावली म्हणून मी हिरो ठरले, असा टोलाही तिने ठाकरे सरकारला लगावला.

दरम्यान, कंगनाच्या इमारतीचे केलेले पाडकाम बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली आहे. कंगनाची वास्तू नवी नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर आहे. महापालिकेने 7 आणि 9 सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. हायकोर्टाने मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांना कंगनाच्या नुकसानभरपाईचा मूल्यांकन अहवाल मार्च 2021 पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.