Take a fresh look at your lifestyle.

“ड्रग्स महाग असल्याने तुम्हाला परवडणार नाही”; कंगानाचा ‘या’ दिग्दर्शकाला उपरोधिक टोला

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या रोखठोक स्वभावामुळे कायम चर्चेत असते. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणा नंतर तिने रोज नवनवीन खुलासे करत बॉलीवूड मधील घराणेशाही ते गुंड माफिया आणि अंमली पदार्थ याविषयी काही खळबळजनक वक्तव्य केली आहेत आणि बॉलीवूड मधील काही कलाकारांवर निशाणा साधला आहे.आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत तिचं ट्विटर वॉर रंगलं आहे. हाय प्रोफाईल पार्टींमधील ड्रग्स खूप महाग असतात त्यामुळे अनुभव सिन्हा यांना बोलावलं जात नाही, असा उपरोधीक टोला कंगनाने त्यांना लगावला आहे.

बॉलिवूडमधील ९९ टक्के मोठे कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात असा खळबळजनक दावा कंगना रणौतने केला होता. तिचं हे वक्तव्य अनुभव सिन्हा यांना आवडलं नाही. “जी व्यक्ती इंडस्ट्रीवर आरोप करतेय तिच ड्रग्स घेत असेल.” अस ट्विट करुन त्यांनी कंगनावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या या ट्विटला कंगनाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं.

“मी बॉलिवूडमधील हायप्रोफाईल पार्टींबद्दल बोलत होते. तिथे ९९ टक्के लोक ड्रग्स घेतात. या पार्टींचं आमंत्रण तुम्हाला दिलं जात नाही. कारण ड्रग्स खुप महाग असतात. तुम्हाला ते परवडणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने त्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’