Take a fresh look at your lifestyle.

अर्णबच्या सुटकेनंतर कंगना खुश ; डान्स करत असल्याचा व्हिडिओ शेअर करत आनंद केला साजरा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुसुम नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. अखेर ८ दिवसांनंतर अर्णब यांना जामीन मंजुर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

दरम्यान, अर्णब गोस्वामी कारागृहातून बाहेर येताच सोशल मीडियावर #ArnabIsBack हा हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रानौतने देखील आनंद झाला असल्याचं सांगत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत ‘आवो जी पधारो मारो देश..’ या गाण्यावर ठेका धरला आहे. 

दरम्यान अर्णबच्या अटकेवरून कंगना राणावतने उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा टीका केली होती. तर काँग्रेसलाही पप्पू सेना म्हणून हिणवले होते. तसेच अर्णब यांना जितका जास्त त्रास देण्यात येईल तितके ते आणखी धीट होतील. त्यांची प्रसिद्धी वाढेल आणि इतिहास पप्पू सेनेला संविधानाच्या चौथ्या स्तंभाला हीन वागणूक दिल्याबद्दल लक्षात ठेवेल. तर, अर्णब यांना एक हिरो म्हणूनच लक्षात ठेवेल, असं कंगना म्हणाली होती.

Comments are closed.