Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कारणांसाठी अभिनेत्री कंगणा राणावतने घेतली राजनाथसिंह यांची भेट

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतच कंगणाने भाजप नेते आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. खरं तर कंगना आणि तिच्या टीमने आगामी ‘तेजस’ सिनेमाबाबत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. तसेच कंगनाने आपल्या सिनेमासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला आणि वायुसेनेकडूनही काही आवश्यक परवानग्या घेतल्याय. भेटीचे फोटो कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कंगना रणौतने तिच्या ट्विटर हॅंडलवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तिच्या टीमसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत दिसत आहे. त्यासोबतच कंगना रणौतने लिहिले की, ‘आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा आशीर्वाद घेतला आणि ‘तेजस’ ची स्क्रीप्ट दिली. वायुसेनेसोबत सिनेमाची स्टोरी शेअर केली आणि आवश्कत त्या परवानग्या घेतल्या. जय हिंद’.

तेजस’या आगामी सिनेमात कंगना रणौत एका फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. इंडियन एअरफोर्स २०१६ मध्ये महिलांना लढाऊ भूमिकेत सामिल करून घेणारी देशातील पहिली डिफेन्स फोर्स होती. सिनेमा याच ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. सिनेमां दिग्दर्शन सर्वेश मेवाडा करणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.