Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री कंगना राणावत उभारणार देवीचं भव्य मंदिर

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि रोखठोक भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. आता देखील ती एका वेगळ्या करणामुळे चर्चेत आली आहे.कंगना राणावत प्रखर हिंदुत्त्वसाठी ओळखली जाते. ती आता एक भव्य देवीचं मंदिर उभारणार आहे. भव्य देवीचं मंदिर उभारण्याची इच्छा तिने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. मंदिर उभारण्यासाठी माता दुर्गाने मला निवडले आहे, असं ट्विट करत तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

कंगनाने आपल्या ट्विटसोबतच कुलदैवताच्या मंदिराचा फोटो देखील शेअर केला आहे. ‘मंदिर उभारण्यासाठी माता दुर्गाने मला निवडले आहे. जे आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी उभारले आहे. मला एक दिवस माता दुर्गेसाठी असं मंदिर उभारायचं आहे. जे तिची किर्ती आणि आपल्या महान संस्कृतीला साजेसे असेल. जय माता दी…’ असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, कंगना राणावत नेहमीच तिच्या प्रखर हिंदुत्त्वासाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी तिने एका देवीच्या पूजेचा फोटो देखील शेअर केला होता. तसेच देशातील राम मंदिरासाठी तिने भारतीय जनता पक्षाचे आभार देखील मानले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.