Take a fresh look at your lifestyle.

संपूर्ण जगाला एकत्र करण्याची ताकद फक्त सोशल मीडियामधेच – कंगना रानौत

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेत्री कंगना रानौत नेहमी आपले परखड आणि स्पष्ट मत मांडत असते. अनेक सामाजिक, राजकीय किंवा इतर अन्य विषयांवर ती वक्तव्य करत असते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना खूपच आक्रमक झाली असून तिने अनेक कलाकारांना घराणेशाही वरून घेरलं आहे. आता तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘माझ्या ट्विटर कुटुंबासाठी’ असं लिहिलं आहे.

ट्विटरवर ती एक व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘कलाविश्वात मला १५ वर्ष झाली आहेत. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर येण्यासाठी दबाव टाकला. पण मला कधी असं वाटलं नाही की मी माझ्या चाहत्यांपासून लांब आहे. कारण मी एक कलाकार आहे आणि मला जे  काही माझ्या चाहत्यांना सांगायचं आहे, ते मी चित्रपटांच्या माध्यमातून सांगते.

पुढे ती म्हणाली, आज मी सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. संपूर्ण जग सामावून घेण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. आपल्याला सुशांतसाठी एकत्र येवून लढायचं आहे. यात आपल्याला यश देखील मिळालं आहे. असं कंगना म्हणाली.

तसेच कंगनाने घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत कलाविश्वात नवीन कलाकारांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केलं होत. सुशांतने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीला बळी पडून आपलं जीवन संपवलं असल्याचं ती सोशल मिडियाच्या माध्यमातून नेहमी सांगत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’