Take a fresh look at your lifestyle.

कंगना रनौतचा धक्कादायक खुलासा ; माझ्या ड्रिंक मध्ये ड्रग मिसळले जात होते ज्यामुळे मला …

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणात, दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अलीकडे सुशांत प्रकरणात ड्रग्स अँगलही जोडला गेला आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही तिच्या जीवनाशी संबंधित काही खुलासे केले आहेत.

कंगना रनौत हिने सांगितले आहे की कशा प्रकारे तिच्या ड्रिंक मध्ये ड्रग मिक्स करून तिला पोलीसांकडे जाण्यापासून रोखलं जात होतं.

कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी त्यावेळी अल्पवयीन होतो आणि माझे मेंटर इतके धोकादायक झाले होते की मी माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स घालायचे म्हणजे मी पोलिसात जाऊ शकणार नाही. जेव्हा मी यशस्वी झाले आणि प्रसिद्ध चित्रपट करू लागले तेव्हा मला सर्वात धक्कादायक आणि भयानक जग आणि ड्रग्स, अय्याशी आणि माफियासारख्या गोष्टींचा सामना करावा लागला.

कंगना रनौत यांनी मोठे आरोप केले आहेत पण कोणाचे नाव घेतलेले नाही. अशा परिस्थितीत, कंगना ज्याच्याविषयी बोलत आहेत ते स्पष्ट नाही. कंगणाचे हे ट्विट अधिकच व्हायरल झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’