Take a fresh look at your lifestyle.

मी डायरेक्ट हाडं तोडते ; कंगणाने काँग्रेस आमदाराला खडसावले

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून तिच्या आक्रमक स्वभावामुळे आणि काही वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आता कंगनाने काँग्रेस आमदार (Congress MLA) सुखदेव पानसे यांच्यावर पलटवार केला आहे. पानसे यांनी अभिनेत्रीला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होतं. याचं सणसणीत उत्तर अभिनेत्रीनं दिलं आहे. आपण कंबर हालवत नसून थेट हाडं तोडत असल्याचं कंगना म्हणली.

काँग्रेस आमदार सुखदेव पानसे यांनी नुकतंच अभिनेत्री कंगना रणौतबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी कलेक्टरच्या समोरच कंगनाला नाचणारी-गाणारी म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी सारनीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कंगनाच्या आगामी धाकड सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्यासाठी पोहोचले होते. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

या लाठीचार्जनंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. याच घटनेचा विरोध करण्यासाठी काँग्रेस रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचलं होतं. निवेदन देताना पांसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडताना कंगनाला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होतं. पांसे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, की पोलिसांनी कंगनाच्या हातची कठपुतली बनायला नको. कारण सरकारं येत जात राहातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.