Take a fresh look at your lifestyle.

कंगना रनौतने खास शैलीत साजरा केला स्वातंत्र्यदिवस ; चाहत्यांना दिला ‘हा’ संदेश

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या देशभक्तीसाठी देखील ओळखली जाते. तिने देशासाठी बलिदान देणारी राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातून ती देशभक्तीचा संदेश देत असते. अशा परिस्थितीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तिने खास अंदाजात हा दिवस साजरा केला आहे. कंगणाने रोपे लावून स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

कंगना रनौतच्या डिजिटल टीमने तिचा एक फोटो शेअर केला आहे. चित्रात कंगनाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तिच्या हातात एक वनस्पती आहे. चित्र पाहताना असे दिसते की कंगनाने आज रोपे लावून हा दिवस अधिक खास बनविला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘या आणि अस बना की या देशाच्या मातीलाही आपला अभिमान वाटेल, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, जय हिंद’.