Take a fresh look at your lifestyle.

इतिहास अर्णब यांना एक ‘हिरो’ म्हणूनच लक्षात ठेवेल ; व्हिडिओ शेअर करत कंगणाने दिला अर्णब गोस्वामीना पाठिंबा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना दिवसांपूर्वी अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावतनेही यात आता उडी मारली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत कंगणाने पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचले आहे.

व्हिडिओ पोस्ट करत कंगना म्हणते की , ‘अर्णब यांना बॉलिवूडमधील ड्रग माफिया, चाईल्ड ट्रॅफिकिंगबाबत गौप्यस्फोट केल्यामुळे आणि सोनियाजींना त्यांच्या खऱ्या नावानं संबोधण्यासाठीच हा त्रास देण्यात येत आहे’. 

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटबाबत लिहित त्यांनी नाईक यांचे थकित पैसे दिले आहेत की नाही हे न्यायालय ठरवेल असं कंगना म्हणाली. 

वेळीच पैसे न दिल्यास कोणी आत्हमत्या करु शकेल का, हे न्यायालयच ठरवेल. बरं जर केलीसुद्धा तर, हा इतका मोठा गुन्हा आहे ज्यावर न्यायालयात खटला व्हावा, असा सवाल तिनं उपस्थित केला. अर्णब यांना जितका जास्त त्रास देण्यात येईल तितके ते आणखी धीट होतील. त्यांची प्रसिद्धी वाढेल आणि इतिहास पप्पू सेनेला संविधानाच्या चौथ्या स्तंभाला हीन वागणूक दिल्याबद्दल लक्षात ठेवेल. तर, अर्णब यांना एक हिरो म्हणूनच लक्षात ठेवेल, असं कंगना या व्हिडिओमध्ये म्हणाली. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.