Take a fresh look at your lifestyle.

केवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड मधील सर्वोत्कृष्ट जोडी म्हणून सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्याकडे पाहिलं जातं. सैफने २०१२ मध्ये अभिनेत्री करिना कपूरसोबत लग्न केलं. या दोघांमध्ये तब्बल १० वर्षांचं अंतर असून ही जोडी कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक असतात. विशेष म्हणजे सैफशी लग्न करण्यापूर्वी करिनाने सैफसमोर एक अट ठेवली होती.

एका मुलाखतीदरम्यान तिने सैफशी लग्न करण्यामागचं कारण सांगितलं. ती म्हणाली की, ‘मला स्वावलंबी राहणं जास्त आवडतं. लग्नानंतरही मला चित्रपटात काम करायचं आहे. पत्नी किंवा आई झाल्यानंतरही माझ्या करिअरवर त्या गोष्टींचा कोणताच परिणाम होता कामा नये असं मला वाटतं.’

या अटीसंदर्भात ती पुढे म्हणाली की, ‘मला आयुष्यभर पैसे कमवायचे आहेत. लग्नानंतरही चित्रपटसृष्टीत करिअर करणार असल्याची अट मी सैफसमोर ठेवली. या गोष्टीला त्याचा नकार नव्हता, म्हणून मी लग्नासाठी तयार झाले.’ अटीप्रमाणेच करिना लग्नानंतरही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे.

करीना आणि सैफ अली खान यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यामध्ये ओमकारा, तशान, कुरबान आणि एजंट विनोद या चित्रपटांचा समावेश आहे. 2020 साल करीनासाठीसुद्धा खास आहे कारण ती दुसऱ्यांदा आई बनणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.