Take a fresh look at your lifestyle.

तैमुरच्या नावावेळी झाला होता वाद ; आता दुसऱ्या बाळाच्या नावाबद्दल करीना म्हणते….

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर लवकरच आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती आपल्या दुसर्‍या बाळाला जन्म देईल. करीना कपूरचे चाहते या गोड बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तिच्या बाळाचं नाव जाणून घेण्याचीही त्यांना इच्छा आहे. दरम्यान आता करिनाने आपल्या बाळाच्या नावाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितलं आहे.

यापूर्वी जेव्हा करिना आणि सैफने पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं होतं तेव्हा त्या नावाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. अनेक महिने या नावाचा वादंग सुरू होता. आता तिने आपल्या दुसर्‍या मुलाच्या नावासाठी केलेल्या योजनेबद्दल सांगितलं आहे. एका चॅट शोमध्ये करिना म्हणाली की तैमूरच्या नावावर झालेल्या वादानंतर मी आणि सैफने दुसऱ्या बाळाच्या नावाचा विचार करणं सोडून दिलं आहे. नाव ठेवण्याची गोष्ट आम्ही शेवटच्या वेळेला ठेवली आहे असे करीना म्हणाली.

दरम्यान, सप्टेंबरमध्ये करिना कपूर आणि सैफ अली खानने एक निवेदन शेअर करत म्हटलं की, ‘आमच्या कुटुंबात आणखी एका सदस्याची वाढ होणार आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. सर्व प्रियजनांचं प्रेम आणि सहकार्याबद्दल धन्यवाद.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.