Take a fresh look at your lifestyle.

‘बुड्ढा होगा तेरा…’; वयावरून हिणवऱ्यांना कविताने दिलं सडेतोड उत्तरं

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील रोखठोक प्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशिक तिच्या बोल्डनेस आणि सडेतोड व्यक्तिमत्वामुळॆ ओळखली जाते. कविताने सब टीव्हीवरील एफआयआर नावाच्या मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. चंद्रमुखी चौटाला नावाचे तिने साकारलेले पात्र अत्यंत लोकप्रिय झाले. मध्यंतरी ती गेल्या बिग बॉसच्या सिजनमध्येदेखील दिसली होती. यातही तिने स्वतःची परखड मते मांडण्यास कधीच माघार घेली नाही. असाच एक परखड अनुभव एका ट्रोलरला आला आहे. एका युझरने कविताला वयावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर राग अनावर झालेल्या कविताने त्या ट्रोलरची चांगलीच बोलती बंद केली आहे.

कविता कौशिकने तिच्या अधिकृत ट्विटरवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात ती कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी ग्लॅमरस लूकमध्ये उभी होती. त्या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे. आकाशात कोणी आहे, त्यामुळे मला मोठी उडी मारता येणं शक्य आहे. कविताच्या या फोटोवर एका युझरने तिला ट्रोल करण्याच्या उद्देशाने कमेंट दिली आहे की, बुढी घो़डी, लाल लगाम. त्या कमेंटला कविताने रिट्विट करीत म्हटले आहे कि, भावा, मी तर कुठल्याही प्रकारचा लाल लगाम लावलेला नाही आणि मेक अप पण केलेला नाही. हा थोडा लिप बाम लावला आहे. मला म्हातारी का म्हणतो आहेस. म्हातारा तर तुझा बापही असेल किंवा आईही. तर मग आता काय करायचं.? या देशात वय वाढणं चूकीचं आहे काय? तुझ्या मुलीला पण तु असचं काही शिकवणार आहेस का? कि बेटा चाळिशीनंतर जग बेकार आहे.

अशा परखड शब्दांत कविताने युझर्सचा डाव चांगलाच उधळला आहे. यापूर्वीसुद्धा कविता अनेकदा ट्रोल झाली आहे . पण तिने नेहमीच ट्रोलर्सला त्यांची जागा दाखवत सडेतोड उत्तर दिले आहे. कविता यापूर्वी बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये दिसली होती. त्यावेळी देखील ती आपल्या कठोर, निस्चयी आणि परखड स्वभावामुळे चर्चेचा विषय झाली होती. कविता कौशिकचा रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्याबरोबर झालेला वाद तिला प्रसिद्धीच्या झोतात घेऊन आला. कविताने मागील काही दिवसांपूर्वी करण मेहरा आणि निशा रावलच्या लग्नावरुन झालेल्या वादातही उडी घेत त्यांना एक सल्ला दिला होता. त्यामुळेदेखील ती माध्यमांच्या प्रकाशझोतात आली होती.