Take a fresh look at your lifestyle.

‘..बरे वागायला शिका’; अभिनेत्री केतकी चितळेने संक्रातीचे औचित्य साधून ट्रोलर्सला मारला टोमणा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री केतकी चितळे मराठी इंडस्ट्रीमधील ओळखीचा चेहरा आहे. तिने अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. अभिनयाशिवाय ती आपल्या रोखठोक व्यक्तिमत्वाची आणि परखड मत तसेच वादग्रस्त विधानांसाठी सतत चर्चेत असते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण ती बोलायची कधी थांबली नाही याचे विशेष कौतुकच करावे लागेल. आता मकर संक्रांतीचे औचित्य साधून तिने ट्रोलर्सला टोमणा मारण्याचे काम उत्तररित्या बजावले आहे.

शुक्रवारी १४ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता नियमांचे पालन करून प्रत्येकाने आपापल्या घरातच हा सण साजरा केला. अशातच नेहमीप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसले. दरम्यान अभिनेत्री केतकी चितळेनेही नेटकऱ्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट समोर आल्यापासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय. कारण केतकीने बरोबर अचूक निशाणा साधत ट्रॉलर्सला टोमणा मारला आहे.

केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, “संक्रांतीच्या शुभेच्छा. फक्त गोड बोलू नका, वागायला शिका. गोड तिळगुळ खाऊन, कटू सत्य बोलायला शिका. ट्रोल करून कटू व्यक्ती होण्यापेक्षा, बरे वागायला शिका.” ही पोस्ट काहींसाठी शुभेच्छा देणारी तर काहींसाठी मात्र सणसणीत पोस्ट ठरली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी ही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जण यावर केतकीला ट्रोल करत आहेत.