Take a fresh look at your lifestyle.

जाको राखे साइया मार सके ना कोई! अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात; सोशल मीडियावर दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय चेहरा आणि नावाजलेली अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. हि घटना पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये घडली आहे. मात्र सुदैवाने किशोरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या कुणालाही दुखापत झालेली नाही. एकंदरच या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्यामुळे चाहत्यांच्या जिवंत जीव आला आहे. आपल्या गाडीला अपघात झाला असून आपण सुखरूप आहोत अशी माहिती स्वतः अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी फेसबुकवर पोस्ट करून दिली आहे. या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्सवरून त्यांचे प्रेम आणि काळजी दिसून येत आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाची बाब अशी कि किशोरी शहाणे सुखरूप आहेत. याबाबत माहिती देताना किशोरी शहाणे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी लिहिले कि, “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय.. देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. ”जाको राखे साइया मार सके ना कोई…”. किशोरी शहाणे यांची हि पोस्ट वाचल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. मात्र त्या सुखरूप असल्याचे समजताच चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. अनेकांनी या पोस्टवर किशोरी यांनी तब्येतीची काळजी घ्यावी अश्या आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.

घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर वृत्त असे कि, अभिनेत्री किशोरी शहाणे या एका कार्यक्रमासाठी जात होत्या. या प्रवासादरम्यान त्यांच्या चारचाकी गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र किशोरी शहाणे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी गाडीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहता त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं तर, अभिनेत्री किशोरी शहाणे या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव आहेत. त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टी गाजवली आहे.