Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांचा ५३वा वाढदिवस; पतीने दिल्या व्हिडिओद्वारे शुभेच्छा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांचा आज वाढदिवस आहे. ८०च्या काळापासून ते आतापर्यंत आपल्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या किशोरी आज स्वतःचा ५३ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. पन्नाशी उलटली तरीही त्या आजही अगदी फिट आहेत आणि आजही तितक्याच सुंदर देखील आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा देत आहेत.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी काल रात्रीच आपल्या वाढदिवसाच्या प्री सेलिब्रेशन केकचा फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. या केकवर फ्रॉम गोवा विथ लव्ह असे लिहिले होते. त्यानंतर त्यांच्या फोटोंचे कोलाज असणारा एक शुभेच्छा व्हिडीओ त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर करीत आभार मानले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले कि, ‘आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल थँंक्यू .. आज मी देवाला प्रार्थना करतो की प्रत्येकाने लसी दिली जावी, प्रत्येकजण सुरक्षित राहू द्या .. देव कृपया आमच्या मानव शर्यत कोविड व्हायरसपासून वाचवा तसेच आपत्ती येऊ नये म्हणून प्रार्थना करा. सुंदर व्हिडिओसाठी कार्तिकचे आभार.

सध्या त्या मालिकेच्या चित्रीकरणासाठी गोव्यात आहेत. यामुळे त्यांचे पती दीपक बलराज विज यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच किशोरींना व्हिडिओद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी बर्थडे गर्ल ला खूप मिस करत असल्याचे व्हिडिओत म्हटले आहे. इतकेच नव्हे तर पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गणपतीला प्रसाद देखील चढवला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करीत किशोरींनी देखील आपल्या कुटुंबियांना मिस करत असल्याचे म्हटले आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे ह्या मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांसह अगदी हिंदी चित्रपटांत देखील अव्वल दर्जाच्या विविध भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्येसुद्धा झळकल्या आहेत. सध्या त्या ‘गूम है किसी के प्यार मे’ या मालिकेत दिसत आहेत.

तर वर्षभरापूर्वीच त्या मराठी बिग बॉस सीजन २ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी पोच केली होती. या आधी त्या जाडूबाई जोरात या मालिकेमध्ये निर्मिती सावंत यांच्यासह मुख्य भूमिकेत होत्या. किशोरी शहाणे यांनी आजपर्यंतच्या २६ वर्षाच्या कारकिर्दीत ७० हून अधिक मराठी चित्रपट सोबतच अनेक हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे.