Take a fresh look at your lifestyle.

वेलकम बेबी राय! अभिनेत्री किश्वर मर्चंटने दिला चिमुकल्या बाळाला जन्म; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका जगतातील अभिनेत्री किश्वर मर्चेंट आणि तिचा पती सुयश राय हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे ते नेहमीच आपल्या चहत्यन्सोब्त आयुष्यातील प्रत्येक गोष्टींची कबुली आणि आनंदाच्या गोष्टी शेअर करताना दिसतात. यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. किश्वर आणि सुयश आई बाबा झाले आहेत आणि हि बातमी त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर चिमुकल्या बाळासोबतचा फोटो शेअर करीत दिली आहे.

शुक्रवारी किश्वरने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या आई किश्वर आणि बाळ या दोघांचीही प्रकृत्ती अगदी उत्तम आहे. किश्वर आणि सुयशने आपल्या बाळासोबतचा पहिला वहिला फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर सध्या शुभेच्छांचा पाऊस पडतोय. सुयश रायने वडील झाल्याच्या आनंदात आपल्या परफेक्ट फॅमिलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आईच्या मिठीत निवांत पहुडलेला लहानगा पाहुणा या फोटोत पहायला मिळतो आहे. किश्वर मर्चेंट आणि सुयश राय या दोघांच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला खूप खूप पसंती मिळते आहे.

हा फोटो शेअर करताना फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, २७.०८.२१. वेलकम बेबी राय! मुलगा झाला आहे. यासोबतच हॅशटॅगमध्ये तिने सुकिशचा बेबी असे लिहिले आहे. किश्वरच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसोबत तिच्या मित्र मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. किश्वर मर्चेंट आणि सुयश राय २०१० सालापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर २०१५ साली त्यांनी बिग बॉसच्या नवव्या पर्वात सहभाग घेतला होता आणि २०१६ सालामध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले. यावर्षी मार्च महिन्यात किश्वरने प्रेग्नेंट असल्याचेसुद्धा सोशल मीडियावर सांगितले होते. नवमाता किश्वर आणि नवपिता सुकेशला खूप शुभेच्छा आणि नव्या पाहुण्यांचे स्वागत करताना अनेको कलाकारांनीही पोस्ट केल्या आहेत.