Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्रीसाहेब योग्य तो न्याय करा; अभिनेत्री क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांची पत्नी था अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहले असून काही लोकांकडून आपल्या कुटुंबियांना त्रास दिला जात आहे. तरी ड्रग्ज प्रकरणात आपल्याला न्याय देण्यात यावा, अशी मागणीही पत्राद्वारे रेडकर यांनी केली आहे.

क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे.. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत..

मी एक कलाकार आहे.. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.. आमचा कहिही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अबू ची लख्तरं चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे..

आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी डल्ले हे राजारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे.. आज वे नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्हीं योग्य तो न्याय करा अशी विनंती, आपली बहिण, क्रांति रेडकर.