Take a fresh look at your lifestyle.

दीपिका नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री प्रभासच्या आदीपुरुष मध्ये साकारणार भूमिका

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. प्रभास या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभास प्रभू श्री रामांच्या भूमिकेत दिसणार आहे तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. आतापर्यंत सीताच्या भूमिकेत कोण अभिनेत्री फायनल झाली आहे हे समजू शकलेले नव्हते. मात्र आता याचा उलगडा झाला आहे.पहिल्या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणच्या नावाची चर्चा होती पण आता ही भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीला मिळाली आहे. आता सीतेच्या भूमिकेत कृति सेनॉन पहायला मिळणार आहे.

तसेच यापूर्वी असे वृत्त आले होते की चित्रपटात लक्ष्मणच्या भूमिकेसाठी सोनू की टीटू की स्वीटी फेम सनी सिंगसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच चित्रपटाच्या संपूर्ण कास्टबद्दल समजणार आहे. आदिपुरूष चित्रपट हिंदू ग्रंथ रामायणावर आधारीत आहे आणि हा एक भव्य सिनेमा असणार आहे

आदीपुरुष मध्ये सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे तर प्रभास प्रभू श्रीरामा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी लंकेचा राजा या विरोधी असलेल्या सैफ अली खानच्या चित्रपटाची पुष्टी केली गेली होती आणि या चित्रपटात अनेक प्रकारचे तलवारीचे युद्ध व धनुर्विद्या यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.