Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री मधुरा वेलणकरचे ‘मधुरव’च्या माध्यमातून रंगभूमीवर कमबॅक; ‘या’ दिवशी होणार शुभारंभ प्रयोग

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 28, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Madhurav
0
SHARES
93
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेतून मराठी अभिनेत्री मधुरा वेलणकरने प्रचंड कौतुक आणि प्रेम मिळवले आहे. मुळात मधुरा हा काही प्रेक्षकांसाठी नवा चेहरा नाही. कारण या आधीही तिने अनेक मालिका, नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यानंतर आता मोठ्या गॅपनंतर मधुरा पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरते आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhura Abhijeet Welankar-satam (@madhurawelankarsatam)

लॉकडाऊनमध्ये मधुराने ‘मधुरव’चे ऑनलाइन पद्धतीने प्रयोग केले. ज्याला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आता ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ हा कार्यक्रम रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या ३ डिसेंबरला या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रयोग शिवाजी मंदिर, दादर येथे संपन्न होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhura Abhijeet Welankar-satam (@madhurawelankarsatam)

मराठी भाषेचा प्रवास, त्यातील गंमत जंमत, तथ्य, गोष्टी, गायन, नाट्य,अभिवाचन, नृत्य, यांची मैफिल म्हणजे ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’. लेखक नसलेले पण लिखाणातून व्यक्त होणारे प्रेक्षकांमधले काही निवडक लेखक या रंगमंचावर आपल्या लिखाणाचे सादरीकरण करतात. या कार्यक्रमात त्या लेखकांशी आणि प्रेक्षागृहातील रसिकांशी मनमोकळा संवाद साधला जातो. प्रश्नमंजुषा- भेटवस्तू असा हा प्रवाही कार्यक्रम असतो. साधारण २ तास हसत- खेळत रसिक वर्ग जगण्यातला आनंद उपभोगतो.

View this post on Instagram

A post shared by Madhura Abhijeet Welankar-satam (@madhurawelankarsatam)

‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः मधुरा वेलणकरचीच आहे. सदर कार्यक्रमाचे संशोधन लेखन डॉ. समीरा गुजर जोशी यांचे तर नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नेपथ्य प्रदीप पाटील, पार्श्वसंगीत श्रीनाथ म्हात्रे, वेशभूषा श्वेता बापट, शीर्षकगीत संगीत ह्रुषिकेश रानडे, पार्श्वगायन ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे यांचे आहे. कलाकार म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासोबत तरुण पिढीतील नवोदित कलाकार आशिष गाडे आणि आकांक्षा गाडे, जुई भागवत आणि श्रीनाथ म्हात्रे आपल्या भेटीला येत आहेत. तर मित्रांनो तुमच्यातही लेखक दडला असेल तर आपले लिखाण [email protected] या मेल आयडीवर जरूर पाठवा आणि मिळवा व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ.

 

 

Tags: Instagram PostMadhura WelankarMarathi Actressviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group