Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री मधुराणी गोखलेने चाहत्यांसोबत शेअर केले लॉकडाऊन रुटीन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. टीआरपीमध्येही हि मालिका काही मागे नाही. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या आहेत. विशेष करून अरुंधती हे पात्र लोकांना अत्यंत भावले आहे. बराच काळ इंडस्ट्रीपासून दूर असलेली अभिनेत्री मधुराणी गोखले प्रेक्षकांना अरुंधतीच्या रूपात भेटली. मधुराणी गोखले या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाली आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रसिकांचा रस असतो. सध्या लॉकडाऊनमूळे शूटिंग बंद आहेत. त्यामुळे आता अरुंधती सुद्धा घरकामात व्यग्र आहे. याबाबतचे रुटीन तिने आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहे.

बहुतेकदा कलाकारांना शूटिंगमुळे घरात लक्ष देता येत नाही. मात्र लॉकडाऊनमुळे आता वेळच वेळ असल्याने कलाकार आपापल्या घरात वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत. यात सा-यांची लाडकी अरुंधती म्हणजे मधुराणीने देखील तिचे लॉकडाऊन रुटीन चाहत्यांसह शेअर केले आहे. घरात जेवण बनवण्यापासून ते आईसोबत गाण्याचा रियाझ करण्यापर्यत सगळ्याच गोष्टी मधुराणी आनंदाने घरात करताना दिसते. मध्येच मुलीलाही अभ्यासात मदत करताना दिसते. याला तिच्या चाहत्यांनी अगदी भरभरून प्रेम आणि लाईक्स केले आहेत.

मधुराणी रिअल लाईफमध्येही घरात काम करत असल्याचे पाहून प्रेक्षकांना कौतुक वाटत आहे. अभिनयाप्रमाणे तिला गाण्याचीही विशेष आवड असल्याचे या दरम्यान सगळ्यांना समजले. या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना ख-या आयुष्यातल्या अरुंधतीविषयी अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. तसेच घरही पाहायला मिळाले. त्यामुळे घरासाठी चाहते खास कॉम्लिमेंट देताना दिसत आहेत. शूटिंग नसताना मधुराणी आपल्या कुटुंबासह एन्जॉय करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. इतकं यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही मधुराणीमधला साधेपणा आजही कायम आहे. साधी राहणी, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे मधुराणीतली अरुंधती खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळतेय.