Take a fresh look at your lifestyle.

‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री माधुरी पवार करणार ‘दिशाभूल’

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’ यासारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पडणारी अभिनेत्री माधुरी पवार लवकरच चित्रपट सृष्टीतही पदार्पण करत आहे. एकीकडे सोशल मिडियावर आपल्या व्हिडिओमुळे माधुरी सतत चर्चेत असते. ती एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. त्यामुळे तिची चर्चा सतत असते. यानंतर माधुरी ‘दिशाभूल’ या आगामी मराठी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Dishabhul तर आरती चव्हाण यांची निर्मिती आणि आशिष कैलास जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ या चित्रपटात माधुरी पवारसोबत ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली कमाल जोडी अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता तेजस बर्वे हे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या ‘दिशाभूल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला. निलेशजी राठोड (गृहमंत्रालय, नवी दिल्ली), रुकिया कडावत (राठोड) (बांधकाम व्यावसायिक), दशरथ गायकवाड (विस्तार अधिकारी) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी दिग्दर्शक आशिष कैलास जैन, डीओपी वीरधवल पाटील, संगीतकार क्रिस मस्करेन्हस,  प्रथमेश धोंगडे, विनोद नाईक, ऍड. प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ कडावत, योगेश गोल्हार आदी मान्यवर उपस्थित होते. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे, प्रणव रावराणे, अरुण कदम, सिद्धेश्वर झाडबुके, आशुतोष वाडेकर, शुभम मांढरे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.

याबाबत बोलताना दिग्दर्शक आशिष कैलास जैन म्हणाले की, ‘दिशाभूल’ हा आजच्या तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर असा ट्रिपल धमाका असणार आहे. तर निर्मात्या आरती चव्हाण यांनी सांगितले कि, ‘दिशाभूल’ हा सानवी प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आहे. तरुण कलाकारांना संधी देतानाच दिग्गज कलाकारांना आम्ही सोबत घेतले आहे.

‘दिशाभूल’ मधून आम्ही करत असलेला वेगळा प्रयोग प्रेक्षकांना भावेल असा विश्वास वाटतो. याशिवाय आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री माधुरी पवार म्हणाली, ‘दिशाभूल’ हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेलला चित्रपट आहे. यातील माझी व्यक्तीरेखा ही मी आज पर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे. चित्रपटाचे शुटींग सुरू झालं असून नवीन टीम सोबत काम करताना मजा येत आहे.