Take a fresh look at your lifestyle.

अर्जुन कपूर नंतर अभिनेत्री मलायका अरोरालाही कोरोनाची लागण

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | देशभर कोरोनाचा कहर सुरूच असून सर्वसामान्य लोकांपासून ते अनेक दिग्गज कलाकार तसेच राजकीय नेते आणि खेळाडू यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.भारतभर पसरलेला कोरोना व्हायरसचा हा विळखा बॉलिवूडमध्येही पसरला आहे. अनेक सेलिब्रिटींना याची लागणही झाली आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने रविवारी स्वत: तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्यानंतर आता, अर्जुन मागोमाग त्याची कथित प्रेयसी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे.

अर्जुन कपूरप्रमाणेच मलायकालाही कोरोनाची कोणतीही लक्षण आढळली नव्हती. मात्र तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर, मलायका होम क्वारंटाईनमध्ये आहे. मलायकाच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’ या शोच्या सेटवरही 7 ते 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. मलायका नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्याबाबत, कधी तिच्या योगा, तर कधी ड्रेसिंगमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

अर्जुनही घरीच क्वारंटाईन असून, त्याच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. अर्जुनला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’