Take a fresh look at your lifestyle.

तुझ्या चित्रपटांमुळे महिलांवरील अत्याचार वाढतोय असे म्हणणाऱ्या यूजरला मल्लिकाने सुनावले खडेबोल

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | हाथरस बलात्कार प्रकरणामुळे महिलांवरील अत्याचार पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यातच एका यूजरने ट्विट करत महिलांवरील वाढत्या अत्याचाराचं खापर चित्रपटांवर फोडत बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला टार्गेट केलं. परंतु संतापलेल्या मल्लिकाने त्याच्या ट्विटला उत्तर देत चांगलेच खडेबोल सुनावले.

काही दिवसांपूर्वी मल्लिकाने एक ट्विट करत म्हणलं होत ,”भारतात महिलांविषयी असलेली मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत काहीच बदलणार नाही”. तिच्या या ट्विटला उत्तर देत एकाने लिहिलं, ‘पण बॉलिवूडमध्ये तू ज्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, त्याच्या विरोधात हे तुझं वक्तव्य आहे. तुझ्या चित्रपटांमधून तू जो संदेश पोहोचवतेस तो सुद्धा अशा घटनांसाठी कारणीभूत असतो असं नाही वाटत का तुला? दुसऱ्यांना उपदेश देण्याआधी स्वत:ला सुधारावं.’

त्या ट्विटर युजरवर निशाणा साधत मल्लिकाने लिहिलं, ‘म्हणजे ज्या चित्रपटांमध्ये मी काम करते, ते बलात्काराचं आमंत्रण देतात. ही तुमच्यासारखी मानसिकताच भारतीय समाजाला महिलांविरोधी बनवतेय. जर तुम्हाला माझ्या चित्रपटांची समस्या असेल तर ते पाहू नका

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.