Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री मंदिरा बेदीने अंधरूढींना झुगारून पतीला खांदा देत अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण केले; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीच्या आयुष्यात अचानक वादळ यावे अशी घटना घडली आणि तिच्यावर शोक व्यक्त करण्याचा प्रसंग आला आहे. मंदिराचे पती अर्थात दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान ते ४९ वर्षाचे होते आणि मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंदिरा आणि राज यांचा प्रेम विवाह होता. त्यांचे एकमेकांवर अतोनात प्रेम होते. यामुळे पतीचे अचानक निधन झाल्यामुळे मंदिरा अगदी कोलमडून गेली आहे. मात्र तरीही शेवटच्या क्षणीसुद्धा तिने पतीची साथ दिली आहे.

समाजाने घालून दिलेल्या रूढी परंपरा गेली कित्येक वर्षे जश्याच्या तश्या सुरु आहेत. मात्र या अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देऊन अभिनेत्री मंदिरा बेदीने तिच्या पतीला खांदा देखील दिला आणि त्यावर अंत्यसंस्कार देखील केले. इतक्या धाडसाने मंदिराने समाजाच्या अंध्रूधी परंपरा झुगारल्या मात्र पतीला अखेरचा निरोप देताना ती स्वतःला सावरू शकली नाही. अक्षरशः हुंदके देत ती रडू लागली.

शिवाय पतीचे पार्थिव उचलतेवेळी मंदिराची झालेली अवस्था पाहून कुणाचेही डोळे पाण्याने भरल्याशिवाय राहणार नाहीत. या दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल इंडियावर वायरल होत आहेत. अनेक नेटकरी मंदिराच्या धाडसाला सलाम ठोकत आहेत शिवाय तिच्या या दुःखद प्रसंगी तिला आधारही देत आहेत.

राज कौशल यांनी एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. दरम्यान त्यांनी प्यार में कभी कभी, अँथनी कौन है, शादी का लड्डू अश्या काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. यामुळे राज कौशल यांच्या निधनानंतर आता बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री मंदिरा बेदी व दिग्दर्शक राज कौशल यांची पहिली भेट मुकूल आनंद यांच्या घरी झाली. एका ऑडिशनच्या निमित्ताने मंदिर तिथे गेली त्यावेळी राज मुकूल यांकडे अस्टिस्टंट म्हणून काम करत होते. इथूनच दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी १४ फेब्रुवारी १९९९ साली लग्न केले. त्यांना ८ वर्षांचा मुलगा आहे. याशिवाय नुकतीच मंदिरा व राज यांनी एका ४ वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले होते आणि ते दोघे मिळून आपल्या मुलांचे संगोपन करीत होते.