Take a fresh look at your lifestyle.

एकदम कडक! बघतोय रिक्षावालाच्या तालावर मानसी नाईकने धरला भोंडल्याचा फेर; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री अर्चना नेवरेकर आणि लीना नांदगावकर यांनी मराठी कलाविश्वातील अभिनेत्रींसाठी भोंडल्याच्या कार्यक्रमाचे उत्साही आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेक लोकप्रिय अभिनेत्री मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. इतकंच नाही तर प्रत्येक अभिनेत्रीने मोठ्या उत्साहात भोंडल्याचा फेर धरला. मात्र, या भोंडल्यानंतर मानसी नाईकने तिच्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या गाण्यावर स्वतःही ताल धरला आणि स्वतःसोबत प्रत्येक अभिनेत्रीला तालावर नाचवलं. मानसीने ‘बघतोय रिक्षावाला’ या सुपर दुपार हिट गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली आणि मग काय? इतरही अभिनेत्री तिच्यासोबत थिरकताना दिसल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Lokmat (@milokmat)

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेली मानसी नाईक आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी इंस्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असते. तसेच यावेळीही तिने भोंडल्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मानसीसोबत मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री भोंडल्याचा फेर धरताना दिसल्या आहेत. अगदी बिग बॉस मराठी सीजन १ ची विजेती मेघा धाडेदेखील या व्हिडिओत दिसून येत आहे. मानसीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मानसी आणि मेघा बघतोय रिक्षावालावर भन्नाट नाचत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

मानसी नाईकच्या लग्नानंतर तिचा हा पहिलाच भोंडला होता. अर्चना नेवरेकर यांनीही त्यांच्या सोशल मीडिया पेजवर भोंडल्याचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडिओवर अनेक चाहते आणि नेटकरी कमेंट करीत आहेत. दरम्यान मानसीच्या चाहत्यांनी तिच्या डान्सचे कौतुक केले आहे. तर टीकाकरांनी मात्र इथेही संधी न सोडता कमेंट्स केल्याचे दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, मराठी भाबी उर्फ परप्रांतीयचे कौतुक बंद करा. पण टिकाकार काय टिका करणारच अश्या मताची मानसी नेहमीच एन्जॉय करताना दिसते. त्यामुळे हाय काय आणि नाय काय..