Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निधन

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं वयाच्या 27 व्या वर्षी निधन झालं आहे. शुक्रवारी संध्याकाळी बंगळुरु इथे मिष्टीने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान किडनीच्या आजाराने अभिनेत्री त्रस्त होती. किडनी फेल झाल्यामुळे मिष्टी च निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.

२०१२ पासून मिष्टी मुखर्जीने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. लाइफ की तो लग गयी हा तिचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर ती काही सिनेमांमध्ये झळकली मात्र बिग बजेट सिनेमा तिला मिळाला नव्हता. 

गेल्या काही महिन्यांपासून मिष्टी कोटो डाएटवर होती. मात्र शुक्रवारी मिष्टीची प्राणज्योत मालवली. मिष्टीच्या पश्चात कुटुंबात तिचे आई-वडील आणि भाऊ आहेत. यामुळे मुखर्जी कुटुंबासोबतच बॉलिवूड आणि बंगाली सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’