Take a fresh look at your lifestyle.

‘या’ अभिनेत्रीने एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा केली कोरोना टेस्ट

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री मौनी रायने गेल्या काही महिन्यांत तब्बल 7 वेळा कोरोना टेस्ट केली आहे. जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना मौनी वेगवेगळे देश फिरत होती.मौनी मार्च महिन्यात बहिणीकडे यूएईत गेली होती. त्याच दरम्यान भारतात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ती चित्रीकरणा निमित्त लंडनला गेली आणि नंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेली होती. दरम्यान मैनीने सात वेळा करोना चाचणी करुन घेतली होती.

गेल्या 7 महिन्यांत तिने 7 कोरोना टेस्ट केल्यात. हा अनुभव खूप वेदनादायक होता. कोरोना टेस्ट खूप त्रासदायक व वेदनादायक आहे. पण ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी 7 महिन्यात 7 टेस्ट केल्यात असे मौनीने सांगितले.

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये मौनीने लॉकडाउनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या याचा खुलासा केला आहे. तिने बहिणीसोबत पेटिंग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच वेगवेगळे पदार्थ बनवले. आई बनवत असलेले काही खास पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला.

त्यानंतर मौनीला एका वेब शोच्या चित्रीकरणासाठी लंडनला जावे लागले. तेथे करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कशी काळजी घेतली जात होती याबाबत मौनीने वक्तव्य केले. ‘त्यावेळी चित्रीकरणाच्या वेळी जे काही नियम आखण्यात आले ते सर्वजण पाळत होते. आम्हाला कमी वेळात या सर्व गोष्टींची सवय झाली होती. तसेच चित्रीकरणाच्या वेळी प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येकाची स्वॅब टेस्ट केली जायची’ असे मौनी म्हणाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’