Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री मौनी रॉयने उरकले गुपचूप शुभमंगल..?; ब्रायडल लूकमधील व्हिडीओ झाला वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे मोठे इव्हेंट आणि लग्न सोहळे यांवर कडक निर्बंधाचा चाप बसला आहे. तरी गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रेटी नियमांचे पालन करीत लग्नबंधनात अडकले असल्याचे दिसत आहे. अशात आता अभिनेत्री मौनी रॉयचा एक ब्रायडल लूकमधील व्हिडीओ समोर आला आहे. सोबतच नववधूप्रमाणे नटलेले फोटो देखील वायरल होत आहेत. हे पाहून असं वाटतंय जणू मौनीने सुद्धा आपले शुभमंगल उरकले आहे.

मौनिचा ब्रायडल अंदाजातील लूक कुणालाही घायाळ करेल आणि बोहल्यावर उभा करेल अगदी असाच आहे. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या मौनीचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड भावतो आहे. सुंदर ब्रायडल लेंहग्यामध्ये आणि मेकअपमुळे मौनीचं सौंदर्यं आणखीच खुलून गेले आहे. मात्र मौनीचा हा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून तिच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर तिने लग्न केले असणार अशी कुजबूज सुरु झाली आहे.

जगभरात मौनीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे मौनाचे लग्न तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच हार्टब्रेक बातमी ठरणार आहे. पण तुर्तास तरी मौनीने लग्न केले आहे की नाही यावर पडदा आहे. एकीकडे असे म्हटले जातेय कि, ब्रायडल फोटोशूट दरम्यानचा मौनीचा हा ब्रायडल लूक असावा. पण मध्यंतरी मौनी रॉयने हातात अंगठी असलेला व्हिडीओ शेअर केला होता. हि अंगठी पाहून तिच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी जोर धरला होता.

छोट्या पडद्यावरील नागिन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्ये आपले आपल्या भविष्याची स्वप्न पाहतेय. २००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे मौनीने ‘गोल्ड’या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात तिची खास भूमिका आहे.

मौनी सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.तिचे फोटो पाहिल्यावर हॉटनेसच्या बाबतीत मौनी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देतेय. मौनी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करते. अभिनयासोबतच ती एक उत्तम डान्सरदेखील आहे. तिचे काही डान्स व्हिडिओसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने शेअर केले आहेत.