Take a fresh look at your lifestyle.

‘या’ हाॅट अभिनेत्रीेने सुरु केली UPSC परिक्षेची तयारी? पुस्तक वाचतानाचा फोटो केला शेअर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत जे उच्चशिक्षित आहेत. मात्र आवडीपुढे डिग्री बाजूला करून त्यांनी कलाक्षेत्राची निवड केली आहे. आजकाल अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. दररोजच्या जीवनातील प्रसंग, घडामोडी वा मजेशीर बाबी ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करीत असतात. मात्र या अभिनेत्रीने तर चक्क अभ्यास करतानाचा फोटो शेअर केला आहे. आहे का नाही काहीतरी हटके. अभिनेत्री नैना गांगुली करतेय UPSC चा अभ्यास. वाचून विश्वास नाही बसत ना. मग पहा हा फोटो.

या फोटोत नैना गांगुली अगदी स्पष्ट दिसतेय. तीच काय तर तिच्या हातात असणारे ‘सर्टिफिकेट फिजिकल ऍण्ड ह्युमन जिओग्राफी’ हे पुस्तक देखील अगदी स्पष्ट दिसत आहे. या फोटोत तिच्या हातात दिसणाऱ्या या पुस्तकामुळेच नैना UPSC चा अभ्यास करतेय अशी चर्चा जोरदार रंगली आहे. या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट करीत ती UPSC च्या अभ्यासक्रमातील पुस्तक वाचतेय हे म्हटले आहे. काहींनी तर या पुस्तकातील अभ्यासक्रम लेनदी म्हणजे खूप जास्त आहे असेही म्हटले आहे. तर काहींनी या फोटोचा अर्थ फक्त UPSC करणारच समजू शकतो असेही म्हटले आहे.

नैनाने हा फोटो शेअर करीत, सत्यापित, माझा आवडता वेळ. वाचन आणि आपला? असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. सौंदर्य आणि बुद्धी याचा योग्य असा समतोल राखणारा हा फोटो चाहत्यांच्या नजर वेधण्यात यशस्वी झाला आहे. नैना चरित्रहीन या बंगाली वेबसिरीज मध्ये दिसली होती. हि वेबसिरीज हिंदी मध्येही रिलीज झाली असून प्रेक्षकांनी यास उचलून धरले होते. यात नैनान ‘किरोनमयी’ ह्या नावाचे पात्र साकारताना दिसली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.