Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री पायल घोषला हवी ‘वाय’ सुरक्षा ; गृहमंत्र्यांना लिहिलं पत्र

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्र लिहून आपला वकील आणि स्वत:साठी वाय दर्जाची सुरक्षा मागितली आहे. पायलचे वकील नितिन सातपुते यांनी सोमवारी आपल्या ट्विटरवरुन हे पत्र ट्विट केलं. आरोपी मोकाट फिरत असून त्याला अद्यापही अटक केली नसल्याचे पत्रात म्हटले आहे. 

मला असुरक्षित वाटत असल्याचे पायल घोषने म्हटलंय. आरोपी मला नुकसान पोहोचवू शकतो त्यामुळे अनिल देशमुखांनी पायल घोष आणि नितीन सातपुतेंना सुरक्षा पुरवावी अशी मागणी यात करण्यात आलीय. 

यापूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पायलला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेतून पायलला न्याय मिळावा अशी मागणी करत खुद्द आठवलेंनीही अनुराग कश्यपवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली होती. असं न झाल्यास आपण धरणे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.