Take a fresh look at your lifestyle.

अनुरागने ‘त्या’ दिवशी गांजा ओढून माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ; पायल घोषने शेअर केला व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप वर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणी पायलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिलं होतं. आता पायलने नुकताच एक व्हिडिओ शेअर करून अजून एक धक्कादायक खुलासा केला आहे. अनुराग तिच्या समोर बसून गांजा ओढत होता अस पायलने म्हंटल आहे. तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहीन असंही पायल म्हणाली.

पायलने या व्हिडीओत सांगितले की, ‘मी मिस्टर कश्यपला फेसबुकच्या माध्यमातून ओळखत होते. त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं होतं. मी गेले होते. त्यांनी मला घरी बोलवलं मी तिथेही गेले. आमच्यात बोलणं झालं. जेवण केलं आणि मी परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलवलं तेव्हा ते ड्रिंक आणि स्मोक करत होते. वेगळाच वास येत होता. मला उलटीसारखं होत होतं. मी विचारलं सर हे काय आहे. तर त्यांनी सांगितलं गांजा. मग ते मला दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेले. पायलने सांगितले की, अनुरागने कपडे काढले आणि जबरदस्ती करू लागले. जेव्हा मी नाही म्हणत होते तर त्यांनी XYZ ची नावे घेतली आणि ४००, ५०० मुलींची नावे घेऊन मला कन्विंस करू लागले. पायल म्हणाली की, ते जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते. ३७६ लागला आहे तर तुम्हाला माहीत असेलच की प्रयत्न करत होता म्हणजे काय झालं होतं.

जे काही झालं त्या विरोधात मी लढत आहे. मी एकटीच लढत आहे. कारण कुणीही साथ देत नाहीय.  इथे सगळे फेक लोक भरलेले आहेत. पण मी कुणालाही सोडणार नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढत राहीन. जे लोक माझ्यासोबत उभे आहेत आणि सपोर्ट करत आहे त्यांचे आभार असेही पायल शेवटी म्हणाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.