Take a fresh look at your lifestyle.

न्यूड व्हिडिओ प्रकरणी पूनम पांडेला दिलासा ; काणकोण न्यायालयाने मंजूर केला जामीन, पण….

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | पॉर्न व्हिडीओ प्रकरणात अटक करण्यात आलेली वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना अटक करण्यात आली तरी रात्री उशिरा काणकोण न्यायालयाने प्रत्येकी 20 हजारांच्या जामिनावर मुक्त केले. मात्र असे जरी असले तरी पुढचे 6 दिवस त्यांना काणकोण पोलीस स्थानकावर हजेरी देण्याची अट घालण्यात आली असून न्यायालयाच्या परवानगीशिवायगोवा सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली.

नक्की काय आहे प्रकरण

पूनम पांडेने गोव्यातील चापोली धरणावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केला होता. लक्षवेधी बाब म्हणजे हे धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. या पार्श्वभूमीवर व्हिडीओबाबत गोवा फॉरवर्ड पक्षानं संताप व्यक्त केला. गोव्यामध्ये सरकारी जमिनीवर अश्लील व्हिडीओ शूट करण्याची संमती कोणी दिली? भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का? असे सवाल करत त्यांनी पूनमवर जोरदार टीका केली. या तक्रारीनंतर पूनम पांडे व तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी हा सॉफ्ट पॉर्न व्हिडीओ शूट करण्यात आला. त्यावेळी पूनम आणि तिचा पती सॅम हे दोघेच तेथे उपस्थित होते. पुनमचा हा व्हिडीओ सॅमने शूट केला होता. हा व्हिडीओ शूट करताना त्या ठिकाणी दोन साध्या वेषातील पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यांनाही निलंबित करण्यात आले असून, या धरणावर पहाऱ्यासाठी त्या दिवशी उपस्थित असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.