हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ११ मार्च १६८९ हाच तो काळा दिवस ज्या दिवशी औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची मोठ्या क्रूरतेने हत्या केली. या दिवशी शिवपुत्र संभाजी राजे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली मात्र हा मृत्यू नव्हता.. तर हे बलिदान होते पुढच्या पिढीचे अस्तित्व वाचवण्यासाठी आणि आपले हिंदुत्व राखण्यासाठीचे.. म्हणूनच आजचा दिवस छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून ओळखला जातो.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल बोलू तितके कमीच.. अन्याय सहन न करण्याची त्यांची वृत्ती गेल्या कित्येक पिढ्यांसाठू ऊर्जादायी ठरतेय. आज संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी देशभरातील तमाम जनता त्यांचे स्मरण करते. या दिनानिमित्त मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने एक खास पोस्ट शेयर केली आहे. यात तिने अभिनेता अमोल कोल्हेंसोबत शिवपुत्र संभाजी या महानाट्यात येसूबाई साकारतानाचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने हि पोस्ट तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केली आहे. यासोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे कि, ‘अंगणाला शोभा तुळशीची, म्यानाला शोभा तलवारीची, भगव्याला शोभा पराक्रमाची.. आणि छत्रपती संभाजी महाराजांना शोभा महाराणी येसूराणी साहेबांची..’ प्राजक्ताची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोला पसंती देत चाहते या पोस्टवर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करीत विविध कमेंट करताना दिसत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत काम केले होते. या मालिकेत अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकले होते तर प्राजक्ता गायकवाड हि महाराणी येसूबाईंच्याच भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. सध्या अमोल कोल्हे आणि प्राजक्ता गायकवाड यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकाचे महाराष्ट्रभरात दौरे सुरु आहेत. या नाटकाच्या भव्य आणि दिव्या सादरीकरणाला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देताना दिसत आहेत.
Discussion about this post