Take a fresh look at your lifestyle.

राज्यपालांच्या हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळीला ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्कार प्रदान; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री प्राजक्ता माळी हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे ती चाहत्यांच्या पुरेपूर संपर्कात असते. आपल्या सौंदर्यासह सहज सुंदर अभिनयाने तिने इंडस्ट्री गाजवली आहे. आजपर्यंत तिने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. पण मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने तिच्या आयुष्यात आणखी एका सुवर्ण योगाचा समावेश झाला आहे. होय. अभिनेत्री प्राजक्ता माळी अक्षय्य तृतीयेदिवशी राजभवनात गेली होती. यादिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते तिला ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याविषयी तिने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

या पोस्टमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीने लिहिले आहे कि, आणि कालच्या शुभमुहूर्तावर “मुंबई- राजभवनात” जाण्याचा योग आला…. काल महाराष्ट्राचे राज्यपाल – मा. श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते “Kamala Rising Star” पुरस्कार मिळाला.. (कला क्षेत्रातील छान कामाबद्दल) मनापासून धन्यवाद, आयोजन समिती व मा. राज्यपाल..अमित त्रिवेदी, प्रतिक गांधी,शेफ रणवीर ब्रार, बिझनेस वूमन अनन्या बिर्ला, धर्मेश, आकाश ठोसर इ. माझ्या काही आवडत्या व्यक्तींसह हा पुरस्कार मिळाला ह्याचा विशेष आनंद…प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन अशा पुरस्कारांमध्ये होतं असं मला वाटतं, त्यामुळे सर्व प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार. असच प्रेम राहू द्या. (आई आणि भाऊ या सोहळ्यासाठी खास पुण्याहून आले होते, फोटो काढायचा राहिला, आईने आकाश बरोबर आवर्जून काढला.. चालायचं)

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ताने सुंदर अशी गुलाबी रंगाची काठा पदराची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. शिवाय या सोहळ्याला तिची आई देखील उपस्थित होती. या फोटोंमध्ये प्राजक्ता कमला रायझिंग पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते स्वीकारतानाचे काही फोटो दिसत आहेत. दरम्यान तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करीत तिचे कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीदेखील प्राजक्ताचे अभिनंदन करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.