Take a fresh look at your lifestyle.

‘परत भोपळे चौक अवस्था’, प्राजक्ता माळीवर आली चक्क भांडी घासायची वेळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसह शेअर करीत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पारंपारिक वेश परिधान केला आहे. इतकेच नव्हे तर ती चक्क भांडी घासताना दिसत आहे. तिच्या या लक्षवेधी फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच चर्चेला उधाण आणला आहे.

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिनं पारंपारिक वेश परिधान केला असल्याचे दिसत आहे. तर यात ती चक्क भांडी घासताना दिसत आहे. मात्र या फोटोंपेक्षाही त्यावर दिलेलं कॅप्शन सर्वांचं अधिक लक्ष वेधून घेत आहे. तीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे कि, “परत भोपळे चौक अवस्था (घरी बसून भांडी घासायची वेळ आली ) गंमतीचा भाग सोडा; परंतू कोरोनाने इतर अनेक गोष्टींबरोबर पैशांचं नियोजन ही देखील गोष्ट शिकवली. ही शिकवण आयूष्यभर लक्षात ठेवूया. तिची हि पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून तिच्या चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने २०११ साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती ‘जुळून येती रेशिम गाठी’, ‘नकटिच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिकांमध्ये झळकली होती. ‘खो-खो’, ‘संघर्ष’, ‘हंपी’, ‘.आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही प्राजक्ताने अव्वल दर्जाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या कॉमेडी रिऍलिटी शोची अँकर देखील आहे.