Take a fresh look at your lifestyle.

‘करवटें बदलते रहें..’ कोणी केलंय प्राजक्ताला बैचेन..?; सोशल मीडिया पोस्टमूळे चर्चांना उधाण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नेहमीच आपल्या विविध गुणांनी चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे तिचा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची फार मोठी संख्या आहे. त्यात ती सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय दिसते. ज्यामुळे तिचे चाहते आणि ती सातत्याने संपर्कात असतात. ती नेहमीच स्वतःचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे मन जिंकताना दिसते. आता मात्र कहर झाला तिने आडून आडून चाहत्यांना बहुतेक प्रेमात पडल्याचे संकेत दिले आलेत. होय. तिने नुकती एच शेअर केलेले फोटो आणि त्यासोबतचे कॅप्शन सांगते कि प्राजक्ता कुणामुळे तरी फार बैचेन झाली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर साडीतील काही कातिलाना फोटो शेअर केले आहेत. तीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंसह एक भन्नाट कॅप्शनसुद्धा लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे कि, ‘करवटें बदलते रहें सारी रात हम…आप की क़सम… (कोणामुळे ते विचारू नका… सच हम कहना सकेंगे और झूठ हम आपसे कहना नहीं चाहते)..’ आता याचा अर्थ लावायचा तरी काय..? एकतर प्राजक्ताच्या कातिलाना अंदाजातील फोटोंनी अनेकांची विकेट काढली होती. पण कॅप्शनने तर चाहत्यांना संभ्रमित केले आहे. प्राजक्ता कुणाच्या प्रेमात तर पडली नाही ना असा सवाल त्यांना पडला आहे.

प्राजक्ताच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तिच्या अंदाज, लूक आणि सौंदर्यासह अनेकांनी तिच्या कॅप्शनची तारीफ केली आहे. याआधीदेखील तिने आपण प्रेमात पडल्याचे चुटुक पुटूक संकेत देणारे कॅप्शन आणि त्यासह फोटो शेअर केले आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वीच तिने किस्सा हम लिखेंगे दिल बेक़रार का…देखेंगे क्या जवाब आता है फिर यार का…। असे कॅप्शन असणारी पोस्ट केली होती. त्यामुळे हास्यजत्रेची अप्सरा आणि चाहत्यांची लाडकी प्राजु नक्की कुणामुळे इतकी बैचेन झाली आहे त्याच्या शोधात अनेकजण आहेत. आता प्राजु सांगेल तेव्हाच कळेल कि हा बेकरार करणारा आहे तरी कोण.