Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री प्रीती झिंटाचे सेक्रेटरी प्रसाद राव यांचे निधन

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचे सेक्रेटरी प्रसाद राव यांचे निधन झाले आहे. प्रीतीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती देत प्रसाद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच 2020 हे वर्षच सर्वात क्रूर असल्याचं देखील प्रीती म्हणाली.

प्रीतीने प्रसाद राव यांच्या सोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हणले , ‘हे वर्ष क्रूर ठरले आहे. मला कधी वाटले नव्हते की या वर्षात असं काही घडेल. प्रसाद तुझ्यावर माझे प्रचंड प्रेम आहे’ असे म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रीतीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत प्रसाद याना श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूड फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने ‘मला ऐकून दु:ख झाले. मला आजही आठवते ते चित्रपटाच्या सेटवर आल्यावर सतत हसत असायचे. तसेच त्यांचे कामही चांगले होते’ असे म्हटले आहे.