बॉलिवूडकरांवर प्रियामणी नाराज; साऊथ कलाकारांची खिल्ली उडवतात म्हणत व्यक्त केला संताप
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच तुफान गाजलेली वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन’ यामध्ये एका विशेष भूमिकेत असणारी अभिनेत्री प्रियामणी हि आजकाल फार चर्चेत आहे. याचे कारण एकतर तिची अभिनय शैली आणि दुसरे म्हणजे बेधडक वक्तव्य. नुकतीच तिने बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत नाराजी व्यक्त केली असून तिने केलेली विधाने फारच चर्चेत आहेत. प्रियामणीच्या म्हणण्यानुसार, दाक्षिणात्य कलाकारांना बॉलीवूडमध्ये दिली जाणारी वागणुक काही बरी नसते. याविषयी बोलताना प्रियामणीने काही विशेष बाब लक्षात आणून दिल्या आहेत.
आपण पाहतो कि बॉलिवूड चित्रपटांमध्ये एखादे साऊथ कॅरेक्टर असेल तर त्या कलाकारांचे हिंदी उच्चार चुकीचे दाखवून तो सिन मजेशीर बनवला जातो. पण हे मजेशीर सिन अनेकदा खिल्ली उडवल्यासारखे वाटते. यावरूनच अभिनेत्री प्रियामणीने नाराजी व्यक्त केली आहे. प्रियामणी एका मुलाखतीत म्हणाली कि, बॉलीवूड प्रेक्षकांमध्ये आजकाल दाक्षिणात्य कलाकार किंवा चित्रपट लोकप्रिय होत आहेत. त्यांचा अभिनय लोकांना आवडतोय हि चांगली गोष्ट आहे. एकेकाळी अशाच प्रकारे श्रीदेवी, हेमा मालिनी आणि रेखा बॉलीवूडवर राज्य करत होत्या. त्यांच्यानंतर फारसं कोणी बॉलीवूडमध्ये चमकले नाही.
पुढे म्हणाली, बॉलीवूडमध्ये दाक्षिणात्य कलाकारांची अशी प्रतिमा दाखवतात की, त्यांना हिंदी बोलताच येत नाही. आइयो, कैसा जी, क्या बोलता जी… अशा प्रकारे दाक्षिणात्य कलाकारांना बॉलीवूड चित्रपटात दाखवले जाते. अर्थात आता बऱ्याच गोष्टी बदलताना दिसत आहेत. मी बरेच चित्रपट पाहिलेत, पण त्यातल्या कोणत्याच चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांना चुकीच्या पद्धतीने हिंदी बोलताना दाखवलेलं नाही. कदाचित बॉलीवूडवाले अशाच लोकांना भेटले असतील जे चुकीच्या पद्धतीने हिंदी बोलतात. पण आता दाक्षिणात्य कलाकार बॉलीवूड चित्रपटात काम करत आहेत आणि यशस्वी होत आहेत. यातच सगळं आलं.