Take a fresh look at your lifestyle.

‘द व्हाइट टायगर’ मध्ये झळकणार प्रियांका चोप्रा ; साकारणार ‘ही’ भूमिका

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रियांका लवकरच द व्हाइट टायगर या आगामी चित्रपटात झळकणा आहे. दिग्दर्शक रमिन बहरानी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर मुकुल देवडा या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

‘द व्हाइट टायगर’ हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या ‘द व्हाइट टाइगर’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव स्क्रीन शेअर करणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटामध्ये मी पिंकी नामक भूमिका साकारत आहे. तर आदर्श बलराम हलवाई या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एका कुटुंबाची आणि एका मुलाच्या संघर्षाची कथा पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत मी अनेक नवोदित कलाकारांसोबत काम केलं, मात्र, आदर्श गौरव हा अत्यंत हुशार आणि गुणी अभिनेता आहे, असं प्रियांका म्हणाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’