प्रियांका चोप्राचे ‘हे’ पुस्तक ठरलं बेस्ट सेलर ; भारतासह ‘या’ देशांमध्येही झालं प्रसिद्ध
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजे अर्थातच अभिनेत्री प्रियांका चोप्राने फक्त बॉलीवूड मध्येच नव्हे तर सातासमुद्रापार हॉलीवूड मध्येही आपली छाप पाडली.आता प्रियांकाचे ‘Unfinished’ हे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झालं. या पुस्तकात माध्यमातून प्रियांकाचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. त्यामुळे सध्या हे पुस्तक चांगलंच चर्चेत आहे. विशेष म्हणजे अॅमेझॉनवर हे पुस्कतक बेस्ट सेलर ठरलं आहे. या पुस्तकाला भारत, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये विशेष पसंती मिळत असून त्याची सर्वाधिक खरेदी करण्यात आली आहे.
अमेरिका, भारत आणि ब्रिटनमध्ये या पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि अॅमेझॉनमधील सर्वाधिक खरेदी केलेले हे पुस्तक बनले आहे. इतकेच नाही तर लोकांना इतके आवडते आहे की, अमेरिकेतील अॅमेझॉनवरही त्याचे ऑडिओ बुक पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. या व्यतिरिक्त, हे पुस्तक सर्वाधिक खरेदी केलेल्या ऑनलाइन बुक स्टोअर बार्न्स अँड नोबलमध्ये पहिल्या 100 स्थानांमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी झाले आहे.
प्रियांकाने या पुस्तकात स्वत: च्या लढाईबद्दल सांगितले आहे की, तिच्या प्रत्येक निर्णयावर ती कशी ठाम राहिली. विशेष म्हणजे प्रियांकाने यामध्ये वंशविवादाबद्दलही चर्चा केली ज्याचा तिला तिच्या आयुष्यात सामना करावा लागला आणि वडिलांच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्याबद्दल तिने लिहिले आहे. याशिवाय प्रियांकाने निकसोबत तिची लव्ह स्टोरी याबद्दल देखील लिहिले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’