Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री रेचल व्हाइटला करोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई | करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या देशभरातील जनता त्रस्त झाली आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीला करोनाची लागण झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली आहे.

उंगली’ आणि ‘हर हर ब्योमकेशी’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रेचल व्हाइट हिला करोनाची लागण झाली आहे. रेचलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

मी करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या घरीच क्वारंटाइन झाले आहे. मला लवकर बरं व्हायचं आहे. त्यामुळे प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा”, असं पोस्ट शेअर करत रिचेल म्हणाली.

दरम्यान, रेचलने पोस्ट केल्यानंतर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या कलाविश्वातील अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच बिग बी आणि अभिषेक बच्चन यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. तर अनुपम खेर यांच्या आईला आणि कुटुंबातील अन्य तीन सदस्यांना करोना झाल्याचं समोर येत आहे.